*संपादक हुसेन मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
सोलापूर : सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या रिजनल अबॅकस स्पर्धेत मंगरुळ (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील श्री प्रोॲक्टिव्ह अबॅकस संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत संस्थेच्या एकूण ११ विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
---: जाहिरात:---
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जयरुद्र जाधव, अपूर्वा डोंगरे, हृदया जगताप, असद बागवान, सागर हजारे, श्रेया हजारे, सई डोंगरे, यश डोंगरे, प्रविण डोंगरे, समेरा मकानदार आणि अदनान मकानदार यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वेगवान गणिती गणना, अचूकता व वेळेचे व्यवस्थापन या निकषांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. मंगरुळच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण सराव व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले
या यशाबद्दल श्री प्रोॲक्टिव्ह अबॅकस मंगरुळचे संचालक आशिष साठे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. तसेच पालक, शिक्षक व ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही हे विद्यार्थी उत्तम यश संपादन करतील, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा