*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
राज्यात नुकतीच नगरपरिषद नगरपंचायत च्या निवडणुका संपन्न झाल्या अकलूज ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक संपन्न झाली आणि अकलूज नगर परिषद मध्ये तेरा प्रभागात २६ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आले त्यापैकी महाविकास आघाडीचे २२ ज्यामध्ये दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवार निवडून आले आणि नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रेश्मा लालासाहेब आडगळे या निवडून आल्या मतमोजणीनंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला आणि अकलूज शहरात प्रत्येक चौकात अभिनंदन व शुभेच्छाचे करणारे डिजिटल बोर्ड झळकले मात्र या निवडणुकीत ज्याने प्रचार केला तसेच स्वतःचा निष्ठावंत कार्यकर्ता असणारे साजिद सय्यद यांना समजावून उमेदवारी माघार घ्यायला लावली आणि आमदार जानकर यांचा शब्द न टाळता साजिद भाई सय्यद यांनी उमेदवारी माघार घेऊन त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवक पदाचे उमेदवार मोहसीन शेख यांना पाठिंबा दिला असे माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचाही या यशामध्ये सिंहाचा वाटा असून अकलूज नगर परिषद मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या मतदारा प्रति आभार व्यक्त करणाऱ्या शहरात शेकडो बोर्डवर सर्व नेत्यांचे फोटो झळकले मात्र एकमेव असे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचा फोटो कोणत्या डिजिटल फोटो दिसून आला नाही ही निराशा जनक बाब असून विद्यमान आमदार उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत मग त्यांचा फोटो डिजिटल बॉर्डर का दिसून येत नाही ? शिवाय नगरसेवक ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षाचे आमदार असून ते दुसऱ्या पक्षाचे नव्हते तर मग असा दुजाभाव का?अशी चर्चा. नागरिकामधून होत आहे
----: जाहिरात:-----👇





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा