*करमाळा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा नगरपरिषदेत प्रखर राष्ट्रभक्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली, करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानदेव होनकळसे, अशोक भणगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
----: जाहिरात:---👇
यावेळी बोलताना ज्ञानदेव होनकळसे म्हणाले की, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी मोठ्या कष्टाने सहकाऱ्यांच्या मदतीने देशात फक्त एक खासदार असलेल्या भाजपाला सत्य वर नेऊन बसविले. प्रखर राष्ट्रभक्ती पक्षावरील त्यांची निष्ठा त्याग, समर्पण, जिद्द यामुळे भाजपा देशात नंबर एक वर पोहोचला असून गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत आला आहे. अटलजींचे विचार आणि त्यांनी घालून दिलेला सुशासनाचा आदर्श आपल्यासाठी सदैव मार्गदर्शक राहील,म्हणूनच त्यांचा जन्मदिवस सर्वत्र सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. असे ज्ञानदेव होनकळसे यांनी सांगितले, यावेळी दत्तात्रय घोलप, बद्रीनाथ गायकवाड, प्रदीप चौकटे, कांतीलाल पवार, विक्रम कांबळे, अमित शहा संजय जगताप इत्यादी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा