*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील प्रवेशित प्रथम व थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आजोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात सहकारमहर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दिपप्रज्वलाने झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे संचालक व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रामचंद्र गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संस्थेचे अभिजीत रणवरे, डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नानासाहेब देवडकर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले आणि त्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक धोरणांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम,जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठण्याचे आवाहन केले.संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते -पाटील व मार्गदर्शक संचालिका कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करत असलेल्या शैक्षणिक कार्याविषयी व विविध उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी संस्थांतर्गत उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्ष बी. फार्मसी मधील आर्यन घाडगे व तृतीय वर्ष बी. फार्मसी मधील कु.अक्षता एकशिंगे यांनी केले.प्रथम वर्ष बी फार्मसी व थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यंदाचा बेस्ट फ्रेशर्सचा मानकरी प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थी गजानन नवत्रे ठरला.यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील द्वितीय,तृतीय व अंतिम वर्ष बी. फार्मसी मधील विद्यार्थी, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा. ऐश्वर्या फुटाणे यांनी केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा