Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

ब्रेकींग न्युज : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी

*सोलापूर --प्रतिनिधी*

*आबिद   बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांचा अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्याने आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख समर्थकांना अचानक धक्का बसला असतानाच भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रमुख पदावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती केली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले आहे.

                               *जाहिरात*

माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशानंतर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी मनातील खदखद व्यक्त केली नकळत त्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरही बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तोंडसुख घेतले.

त्यातच आता पुन्हा सचिन कल्याणशेट्टी यांची महापालिका निवडणुकीच्या प्रमुख पदी निवड झाल्याने हा पुन्हा देशमुखांना धक्का तर म्हणता येणार नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा