*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर येथील नवोदित कवयित्री सौ.शुभांगी संतोष दहिवाळ यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.हे फेस्टिवल पुणे येथील एस.एम.जोशी फाउंडेशन समाजभवन येथे दि.२,३,४ व ५ जानेवारी २०२६ दरम्यान चार दिवसांचा महोत्सव आयोजित केला असल्याचे माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील व परदेशातील कवींसाठी हा फेस्टिव्हल एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता,स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व संविधानवादी विचारधारेवर आधारित कविता सादरीकरणासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे.निवड झालेल्या कवींना फेस्टिव्हल दरम्यान आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी पंढरपूरच्या कवयित्री सौ.शुभांगी दहिवाळ यांची निवड झाली आहे.त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या महोत्सवातील सहभागामुळे पंढरपूरला सन्मान मिळणार आहे.निवड झालेल्या कवींनी दि.२ जानेवारी २०२६ रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे.असे आयोजक विजय वडवेवार यांनी पत्र दिले आहे.
-----: जाहिरात :-----👇
*चौकट...*
सौ.शुभांगी संतोष दहिवळ यांचे शिक्षण-एम ए - 1 अर्थशास्त्र,बी.एड, डी.टी.एड झाले आहे.त्यांना कविता लिहिणे,वाचन,प्रवास करणे आदी छंद आहे.आजपर्यंत मार्मिक संवाद, दीपावली विशेषांक - २०२४ मध्ये ललित लेख कविता महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलवर साहित्यातील नवदुर्गा या नवरात्रीचा जागर कार्यक्रमात तीन कविता सादर केल्याआहेत.जागतिक मातृत्व दिनाच्या निमित्ताने सहा भागांची मार्मिक संवाद न्यूज,पंढरपूर कडून मुलाखत प्रसिद्ध.श्रावणसरी या कविता संग्रहात कविता प्रसिद्ध, काही कविता संग्रह प्रसिद्धीच्या मार्गावर.त्यांना काव्य शिरोमणी पूरस्कार व सन्मानपत्र- पुष्पाई व साहित्य वर्तुळ पंढरपूर सन्मानपत्र व सन्मानचिन्ह,अर्लिअन कवियोंका अध्यात्म तर्फे अनेक सन्मानपत्र व सन्मानचिन्ह.साहित्य सेवा संघ व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय तर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह.काव्ययोग काव्य संस्था लातूर तर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह.शब्द पंढरीचे आम्ही वारकरी, परभणी आयोजित कविसंमेलनात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह,पंढरपूरमध्ये आयोजित कवितेची मासिक भिशी या कार्यक्रमात सहभाग.भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तसेच राजयुवा प्रकाशन पुणे येथे राज्यस्तरीय कुसुमाग्रज कवी संमेलनमध्ये दोन कविता संग्रहात कविता प्रकाशित.अवधूत प्रकाशन प्रस्तुत काव्यस्पंदन प्रातिनिधिक कविता संग्रहात १० कविता गुरूजींच्या कवितामध्ये सहभाग.
*सौ.शुभांगी संतोष दहिवाळ*
मु.पो.पंढरपूर जि.सोलापूर.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा