*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तांदुळवाडी (ता.माळशिरस)येथील हनुमान प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यवहार ज्ञान, वृद्धिगत व्हावे गणितीय संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट व्हाव्यात या उद्देशाने प्रशालेत सकाळी ९ .00 ते १२.00 या वेळेत ‘आनंद बाजार’चे आयोजन करण्यात आले होते
या आनंद बाजाराचे उद्घाटन हनुमान विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मारुती दुधाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. याशिवाय पालक व माता पालकवर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर लाभली.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, फळे,भाजीपाला, कडधान्ये तसेच शैक्षणिक साहित्य अशा वस्तूंचे स्टॉल्स लावले होते. एकूण ५० स्टॉल्सना मान्यता देण्यात आली होती. या बाजारातून विद्यार्थ्यांनी सुमारे २५,००० रुपयांपर्यंतची यशस्वी विक्री केली.
### जाहिरात ###👇
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,आर्थिक साक्षरता, व्यवहारकौशल्य व उद्योजकतेची बीजे रुजली.भविष्यात विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची मागणी पालकांकडून व्यक्त करण्यात आली असून, प्रशालेकडून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा