Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

*जिल्हा परिषद पंचायत समिती करमाळा शिवसेना स्वबळावर लढवणार--जिल्हाप्रमुख, महेश चिवटे* *शिवसेना संपर्क नेते माजी आमदार संजय कदम घेणार इच्छुकांच्या मुलाखती*

 *करमाळा प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस माढा करमाळा या तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून इच्छुकांच्या मुलाखती सोलापूर जिल्हा संपर्क नेते माजी आमदार संजय कदम घेणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे 

 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल जनतेत प्रचंड सहानुभूती असून त्यांच्या कामाच्या जीवावरच निवडणुका लढवल्या जाणार आहेत 

 शिवसेनेने गेली तीन वर्षात सोलापूर जिल्ह्यात केलेले सामाजिक काम व सर्वसामान्यांना केलेली मदत ही इतर सर्व पक्षांपेक्षा काही पटीने  जास्त होती 

 सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सहा नगरपालिका शिवसेनेने जिंकले असून येणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा करण्याचा स्वप्न शिवसैनिकाचे आहे 

 शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयात आपले अर्ज भरून द्यावे असे आव्हान पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे 

 सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची शिवसेना तयारी करत असून निवडणूक लढवण्यात युती आघाडी करण्याचे सर्व अधिकार संपर्क नेते आमदार संजय कदम यांना देण्यात आले आहे

                        ####:-- जाहिरात --:###👇

 याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की 

 संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट महायुती  असून शिवसेनेला मानसन्मान व योग्य तो सत्तेत वाटा मिळाला तर महायुतीतून सुद्धा निवडणूक लढवण्याची शिवसेनेची तयारी आहे 

 मात्र सध्या आम्ही स्वबळाची तयारी करत असून युती आघाडी करण्याचे सर्व शिवसेने पुढे उपलब्ध असल्याचे चिवटे यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा