Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

*आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी शुभम गोरे व स्नेहल गोरे या पती-पत्नीची निवड.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील नवोदित कवी शुभम गोरे व कवयित्री सौ.स्नेहल गोरे या पती पत्नीची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.हे फेस्टिवल पुणे येथील एस.एम.जोशी फाउंडेशन समाजभवन येथे दि.२,३, ४ व ५ जानेवारी २०२६ दरम्यान चार दिवसांचा महोत्सव आयोजित केला असल्याचे माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

             महाराष्ट्रासह देशभरातील व परदेशातील कवींसाठी हा फेस्टिव्हल एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता,स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व संविधानवादी विचारधारेवर आधारित कविता सादरीकरणासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे.निवड झालेल्या कवींना फेस्टिव्हल दरम्यान आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.

           या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अकलूज येथील शुभम गोरे व स्नेहल गोरे यांची निवड झाली आहे.त्यांच्या या सहभागामुळे महोत्सवातील अकलूजला सन्मान मिळणार आहे.निवड झालेल्या कवींनी दि.२ जानेवारी २०२६ रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे.असे आयोजक विजय वडवेवार यांनी आवाहन केले आहे.

                      @@ जाहिरात @@👇



*चौकट--*

वयाच्या १३ व्या वर्षापासुन कविता लिखाणास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शेरोशायरी, चारोळी असे लिखाण सुरु केले.नंतर कवितांचा छंद जोपासला आहे.नित्य वाचन या माध्यमातुन वेगवेगळ्या विषयावर कविता केल्या.त्यामध्ये मैत्री,प्रेम,नाते,नैसर्गिक,विरह कविता असे लिखान केले आहे.विविध प्रातिनिधीक काव्यसंग्रहात कविता प्रकाशित आहेत.दिवाळी अंकामध्ये कविता प्रकाशित झाल्या आहेत. आयुष्यभराची नाती या पुस्तकाचे लवकरचं प्रकाशन होणार आहे. सोलापूर येथे काव्य शिरोमनी पुरस्कार प्राप्त व  हैद्राबाद येथे राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

      *शुभम किरण गोरे (कवी)*

अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर

*चौकट-*

लग्नानंतर पतीमुळे कविता लिहण्याची आवड निर्माण झाली. चारोळी पासुन सुरुवात केली 

आणि पहिल्यांदाच फुले फेस्टीवल येथे अध्यक्षपदी निवड आणि कविता सादरीकरण करण्याचे भाग्य मिळाले आहे.पतीची सोबत आणि सासरची साथ त्यामुळे हे यश प्राप्त करु शकले.


*सौ.स्नेहल शुभम गोरे (कवयित्री)*

अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा