Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

*११५ कोटी रूपये, ४५ किलो 'ड्रग्स' अन् पाचगणीतले 'ते' हॉटेल. सख्ख्या भावामुळेच एकनाथ शिंदे अडचणीत ?*

 *संपादक  हुसेन मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*



पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळच्या दरे गावचे रहिवासी. या गावापासून जवळच असलेल्या सावरी येथे मुंबई पोलीसांनी सुमारे ११५ कोटी रूपयांचा ४५ किलो ड्रग्सचा साठा जप्त केला. पोलीसांनी धाड टाकलेले 'हॉटेल तेज यश' हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकिचे. या हॉटेलचा व्यवसाय दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे सांभाळतात. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दबावामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.         

    ‌.                         *जाहिरात*



संसदेत आणि विधीमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ही मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भुमिका घेतल्याने या प्रकरणाची चौकशी निपष्कपणे होणार का? या प्रकरणाचे धागेदोरेे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणाणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, 'पाचगणी हे राज्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, पाचगणीचा परिसर अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे पाचगणीमध्ये 'तेज यश' नावाचे हॉटेल चालवतात. काही काळापासून या हॉटेलचा व्ययवसाय रणजीत शिंदे पाहत आहेत. या हॉटलेवर पोलीसांनी ११५ कोटी रूपयांचा ४५ किलो ड्रग्स साठा जप्त केला होता. त्यानंतर प्रकाश शिंदे यांनी हॉटलेशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून सगळे आरोप फेटाळले. मात्र, प्रकाश शिंदे हे खोटे बोलत आहेत. हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग प्रकाश शिंदे हेच घेत असून, त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक त्याठिकाणी आहे. त्यांनी दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे फरार का झाला, हे सांगावे.'

'या प्रकरणात पदाचा दुरुपयोग करून तपास यंत्रणावर दबाव टाकला जात आहे. राज्यातील मुले ड्रग नावाखाली देशोधडीला लावले जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे,' असेही शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

'आता तिसरी विकेट'

'या प्रकरणात खासदार संजय राऊत पुढील आठ दिवसात पुन्हा एकदा प्रसारमाध्यमात शिवसेनेची (ठाकरे) भूमिका मांडणार आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा लवकरच होणार आहे. दोन वर्षात राज्य सरकारमधील दोन मंत्री विकेट पडली आहे. आता तिसरी विकेट पडणार आहे,' असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

त्या म्हणाल्या,'आरोपी ओंकार डिगे हा स्वतःहून काल रात्री मुंबईत पोलिसांना हजर झाला. मात्र, त्याला अटक करण्यात आली नाही. साताऱ्यात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करण्याऐवजी आरोपीची पाठराखण केली. ड्रग विरोधात कारवाई करताना घटनास्थळी चुकून ४० लिटरचे निळे ड्रम सापडल्याचे, सांगितले जात आहे. पाचगणीमध्ये कोकेन हा अंमली पदार्थ पोलिसांनी पकडला. त्यात मुंबई परिसरातील काही आरोपी सापडले आहेत. पालकमंत्री मंत्री शंभूराजे देसाई आणि सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी वेळेत कारवाई का करत नाहीत? मुंबईमधील पोलिस येऊन पाचगणीत ड्रग्सचा साठा जप्त करतात, पालकमंत्री आणि पोलीस अधिक्षक नेमके काय करत होते? या परिसरात एखादी बॉम्ब फॅक्टरी चालू असती तर… तुमचा नेता राहतो त्याठिकाणीची सुरक्षा धोक्यात आली असती. बारमध्ये ड्रग कोठून येतात? हे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असलेल्या शंंभुराजे देसाई यांनी सांगावे.'

'संसद, विधीमंडळात हा विषय मांडणार'

आमच्या पक्षाचे खासदार संसदेत याबाबत प्रश्न विचारतील. गृहमंत्री अमित शाह यांनाही या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना भेटून याबाबत कारवाईची मागणी करणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने ही या प्रकरणात उडी घेतली असून, या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही? असा सवालही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा