*कार्यकारी संपादक -एस .बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378 081 147*
बावडा : रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी पिंपरी बु. येथे (दिनांक 18 डिसेंबर)सेंद्रिय गूळ उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन सेंद्रिय गूळ निर्मितीच्या शास्त्रीय तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले. ऊसापासून सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करण्याची पारंपरिक तसेच सुधारित तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती कृषिदूतांनी दिली
या प्रात्यक्षिकामध्ये ऊस गाळप, रस स्वच्छीकरणासाठी नैसर्गिक व रसायनमुक्त स्पष्टकांचा वापर, उकळणी प्रक्रिया, योग्य तापमान नियंत्रण, फेस काढण्याची पद्धत तसेच स्वच्छ व दर्जेदार सेंद्रिय गूळ तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय गूळ उत्पादनामध्ये स्वच्छता, रसायनमुक्त प्रक्रिया व योग्य साठवण पद्धती यांचे महत्त्व कृषिदूतांनी स्पष्ट केले.
*जाहिरात*
तसेच सेंद्रिय गूळ तयार केल्यास बाजारात अधिक मागणी व चांगला दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते, असे यावेळी नमूद करण्यात आले. सेंद्रिय गूळ उत्पादन हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मूल्यवर्धित व पर्यावरणपूरक व्यवसाय ठरू शकतो, असेही सांगण्यात आले.
या प्रात्यक्षिकामध्ये किरण बिडवे, प्रज्वल सुतार,अभिषेक काळे, किरण कदम, रत्नदीप कचरे, श्रेयस कोरडे, सुजल शहाणे या कृषिदूतांनी सहभाग घेतला. या प्रात्यक्षिकाचे आयोजन अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), विषयतज्ञ प्रा. एच. डी. कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा