Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

ॲड. सुनील झेंडे यांच्या युक्तिवादामुळे इंदापूर खंडणी प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*



 हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी असलेले पत्रकार भूषण साळवे यांना इंदापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीला दिलासा मिळवून देण्यात विधिज्ञ ॲड. सुनील झेंडे यांच्या सखोल अभ्यासपूर्ण आणि प्रभावी कायदेशीर युक्तिवादाची महत्त्वाची भूमिका ठरली.


                       *****जाहिरात*****



      या प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकाने इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरोपींनी नकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीवर करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला व आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आरोपीच्या वतीने ठेवण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान पोलिसांनी जामीनास विरोध दर्शविला. मात्र आरोपींच्या वतीने ॲड. सुनील झेंडे यांनी तपासाची सद्यस्थिती, कायदेशीर तरतुदी, आरोपीची भूमिका तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निकालांचे संदर्भ देत न्यायालयासमोर मुद्देसूद आणि संतुलित मांडणी केली. तपासाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला असून आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दीर्घकाळ कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा ठोस युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

    न्यायालयाने आरोपीच्या वतीने मांडलेल्या सर्व मुद्देचा व युक्तीवादाची दखल घेत आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा