Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

*धुरंधर हा धोकादायक चित्रपट, कारण...", युट्यूबर ध्रुव राठीनं नोंदवलेली निरीक्षणे काय आहेत?*

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*


कटेंट क्रिएटर ध्रुव राठीने दिग्दर्शक आदित्य धरच्या धुरंधर या चित्रपटावर एक टिका करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा चित्रपट धोकादायक प्रचाराचा आणि खोटेपणाचा मोठा नमुना असल्याचे म्हटले आहे. राजकीय विषयांवर नेहमीच भाष्य करणाऱ्या ध्रुव राठीने चित्रपटातील हिंसेबद्दल अनेकदा टीका केली आहे. भारतात नुकत्याच गाजत असलेल्या धुरंधर चित्रपटाबद्दल बोलत असताना राठीने म्हटले की, चित्रपटात राजकीय भाष्य आहे आणि इतर वाईट चित्रपटांपेक्षाही हा चित्रपट जास्त धोकादायक आहे

                              ---: जाहिरात:---👇


धुरंधर धोकादायक प्रचार

शनिवारी संध्याकाळी ध्रुव राठीने आपल्या युट्यूब चॅनेलवर रिॲलिटी ऑफ धुरंधर नावाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने धुरंधरला खोटा आणि वाह्यात प्रचार असल्याचा आरोप केला आहे. “दिग्दर्शक आदित्य धरने चित्रपटातून असत्य पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर चित्रपट चांगल्या पद्धतीने बनवला असल्यामुळेच तो अधिक धोकादायक झाला आहे. चांगल्या प्रकारे बनवलेला प्रचारपट हा कधीही जास्त धोकादायक असतो. द ताज स्टोरी आणि द बंगाल फाइल्ससारखे चित्रपट धोकादायक नव्हते, कारण मुळातच वाईट होते, पण धुरंधर त्या तुलनेत आकर्षक झाला आहे”, असे राठीने म्हटले आहे.

धुरंधर हा केवळ एक मनोरंजनात्मक चित्रपट आहे, असे सांगून चित्रपटाचा बचाव करणाऱ्यांनाही ध्रुव राठीने टोला लगावला आहे. “धुरंधर चित्रपटात तुम्हाला वारंवार खऱ्या प्रसंगातून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. ट्रेलरमध्ये हेच सांगितले. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे खरेखुरे फुटेज चित्रपटात वापरण्यात आले आहे. दहशतवादी आणि त्यांच्या हस्तकांचे फोन रेकॉर्डिंग चित्रपटात वापरण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानच्या ल्यारीमधील गँगस्टर आणि पोलिसांचेही नावे यात दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटात दाखवलेले वास्तव असल्याचा भास होतो. पठाण आणि टायगर सारख्या स्पाय थ्रिलर्समधून असे दिसत नव्हते”, असेही ध्रुव राठी सांगतो.

धुरंधरवरील सविस्तर व्हिडीओ पोस्ट करण्यापूर्वी ध्रुव राठीने आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने ३०० कोटींच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला उध्वस्त करणार असल्याचे म्हटले होते.

आदित्य धर यांच्याकडून अद्याप ध्रुव राठीच्या व्हिडीओवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा