Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

*गौंडरे ते गौंडरे फाटा रस्त्याचा प्रश्न सुटणार; आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागणीला सा.बा. मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दाखवला हिरवा कंदील...*

 *करमाळा ---प्रतिनिधी* 

 *अलिमभाई  शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा तालुक्यातील गौंडरे ते गौंडरे फाटा या जवळपास पाच - सहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गेली अनेक वर्षांपासून अतिशय बिकट अवस्था झाली होती. विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध, महिला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. या खराब रस्त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात येथे वारंवार होत आहेत. यामुळे ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडे केली असता त्यांनीही या परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन यासाठी लागणारा 2.25 कोटी निधीची सा.बा.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्याकडे आपले शिष्टमंडळ पाठवून मागणी केली. या मागणीला भोसले साहेबांनी हिरवा कंदील दाखवत या रस्त्यासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात येईल असे सांगितले. 

                         ----: जाहिरात:---👇-


आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक दत्तात्रय जगदाळे, सोमनाथ लोहार (अध्यक्ष: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्र विभाग , योगेश खंडागळे (पत्रकार), माधव हनपुडे, युवराज जगताप, अक्षय गोफणे यांनी मुंबई येथील पन्हाळगड या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेऊन या कामाचा पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिकांना, प्रवाशांना अतिशय त्रासदायक असलेल्या रस्त्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल आमदार नारायण आबा पाटील तसेच सर्व शिष्टमंडळाचे ग्रामस्त व सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे. यावर  शिष्टमंडळाला आपली प्रतिक्रिया विचारली असता, यापुढेही या भागातील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तण मन लावून काम करणार असल्याचे यावेळी युवा उद्योजक दत्तात्रय जगदाळे यांनी सांगितले 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा