*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
शिक्षण हक्क मंच, पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री .मतीनभाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांना एकत्र करून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.
श्री चांदभाई बळबट्टी यांनी अल्पसंख्याक हक्क दिन आयोजित करण्यामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केले. या निमित्ताने अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली. या दिवशी निबंध व भित्तीपत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिका माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण हक्क मंचच्या विद्यार्थ्यांनी केले होते, ज्यांचे शिक्षण पुणे महानगरपालिका शाळांमधून झाले असून ते सध्या UPSC, लॉ तसेच मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारी करत आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणांतून उपस्थित विद्यार्थी, शिक्षणअधिकारी तसेच शिक्षकांनाही प्रेरणा दिली.
या प्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. आशा उबाळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
मा. आशा उबाळे मॅडम, श्री मतीनभाई मुजावर, श्री चांदभाई बळबट्टी, शिक्षण हक्क मंचचे सर्व शिक्षक, पुणे महानगरपालिका माध्यमिक उर्दू विभागातील शाळांचे मुख्याध्यापक/प्राचार्य व शिक्षक यांनी अल्पसंख्याक हक्क दिन, त्यांचे हक्क, कर्तव्ये, समस्या व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले.
-----: जाहिरात:----
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्य व शिक्षकांनी आभार मानले.
*मतीन मुजावर*
*शिक्षण हक्क डेव्हलपमेंट रिसर्च अँड प्रमोशन मंच ,पुणे .**








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा