उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील कै. नामदेवराव जगताप सेवाभावी संस्था संचलित भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी युसुफ मुसा शेख यांची निवड झाली आहे
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक युसुफ शेख सर हे महाराष्ट्र जि प अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना सोलापुर चे कार्याध्यक्ष असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे करमाळ्याचे माजी आमदार मा.जयवंतराव जगताप, जि प अल्पसंख्यांक कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरिफुद्दीन खान साहेब, पुणे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब शेख, जिल्हाध्यक्ष हजरत शेख, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य सदस्य ज्येष्ठ पत्रकार आलिम शेख तसेच ऑल इंडिया ह्यूमन राइट चे तालुका अध्यक्ष आयुबभाई शेख इ मान्यवर यांनी श्री शेख यांच्या निवडीबद्दल विशेष अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या
युसुफ शेख सर हे गेले कित्येक वर्षापासून जातेगाव येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून एक हजर जबाबी व हुशार शिक्षक म्हणून शिक्षक वर्गात नावलौकिक आहे त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षक वर्गातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा