अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) या महाविद्यालयाने यंदाच्या वर्षी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील उर्फ बाळदादा यांचा ७६ वा वाढदिवस एक अनोख्या अंदाजात साजरा केला.पंढरपूर येथील हिरा प्रतिष्ठान संचालित पालवी विशेष बालकांचा (एच आय व्ही बाधित) संगोपन प्रकल्प पंढरपूर,येथे डी.फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. समाजावर,लहान मुलांवर, दीनदुबळ्यांवर प्रेम करणारे लाडके नेते बाळदादा यांच्याकडून मिळालेल्या सामाजिक दृष्टिकोनातून सुचलेली हि संकल्पना आज डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सत्यात उतरवली आहे.अशा सामाजिक कार्यातून महाविद्यालयाने बाळदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.बाळदादांच्या वाढदिवसानिमित्त पालवी प्रकल्पातील मुलांना खाऊ वाटप केला व त्या मुलांचा एक दिवस आपल्यामुळे आनंदी होईल यासाठी प्रयत्न केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा