*करमाळा प्रतिनिधी*
*अलीमभाई शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अतिवृष्टी मुळे नुकसान होवून चार महिने झाले तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली नसुन अनेक शेतकरी बॅंक, पोस्ट ऑफिस, कृषी कार्यालय, महसूल कार्यालयात खेटे मारत असून प्रचंड शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्याने युवासेना तालुकाप्रमुख समाधान उर्फ शंभूराजे फरतडे यांनी या संदर्भात अक्रमक भुमिका घेतली आहे. सोमवारी या संदर्भात तहसिलदार यांना निवेदन देऊन रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात येणार असल्याचे फरतडे यांनी सांगतीले आहे तसेच शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहाभागी होण्याचे अवहान त्यांनी केले आहे.
या बाबत अधिक बोलताना फरतडे म्हणाले कि सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले महसूल व कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामे देखील करण्यात आले आहेत मात्र पंचनमाने होवून चार महिने मात्र फार्मर आयडी, kyc च्या फेर्यात हि मदत अडकली असून हजारो शेतकरी मदती पासून वंचित राहिले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी, केवाईसी करून देखील फक्त मदत मंजूर असल्याचे दिसत आहे मात्र प्रत्यक्षात खात्यात मदत जमा झालेली नाही. काही बॅंकानी कर्ज खाते थकबाकीत गेल्याने मदतीचे पैसे गोठवून ठेवले आहेत.
*****जाहिरात******👇
जाहीर केलेल्या मदतीच्या तुलनेत मिळणारी रक्कम खूप कमी आहे उदा. हेक्टरी ४७ हजार रुपयांच्या घोषणेनंतर अनेक शेतकऱ्यांना केवळ ५ हजार मिळाले आहेत तसेच तेवढेच क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना अधिक पैसे जमा झाले आहेत. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून येत असताना या संदर्भात त्यांना कोणतीच माहिती व्यवस्थित दिली जात नाही या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने युवासेनेकडुन आंदोलनाचा पर्याय हाती घेतला असून या संदर्भात सोमवारी युवासेनेचे शिष्टमंडळ तहसिलदार यांना निवेदन देणार आहे बाधित शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी घेऊन ११ वा उपस्थित रहावे असे अवहान युवासेना तालुकाप्रमुख समाधान उर्फ शंभूराजे फरतडे यांनी केले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा