Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उभारी घेईल ---माजी आमदार प्रकाश यलगुलवार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीवर भर द्यावा-- चेतन भाऊ नरोटे

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही; फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उभारी घेईल असे मत ,”माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी मांडले

       तर ,काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवावेत तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मितीवर भर द्यावा असे आवाहन चेतनभाऊ नरोटे यांनी केली.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी गतीमान करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या पुढाकाराने आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन, सोलापूर येथे आयोजित केली होती. 

यावेळी अँड केशव इंगळे, गणेश डोंगरे, फिरदौस पटेल, देवाभाऊ गायकवाड, शफी हुंडेकरी, उदय चाकोते, नागनाथ कदम, वाहिद बिजापूरे, मोहसीन मैंदर्गीकर, शाकीर सगरी, मीनाताई गायकवाड, आदींनी आपले विचार व्यक्त केले. 


           यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले, काहीजण काँग्रेस अडचणीत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण १९७८ मध्ये परिस्थिती याहूनही गंभीर होती. त्या काळात सभांना परवानगी दिली जात नव्हती. तरीही ‘पहले रोटी खाएंगे, इंदिराजी को लाएंगे’ या घोषणेतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आणि इंदिरा गांधींनी झंझावती प्रचारातून पुन्हा प्रचंड बहुमतासह सत्तेवर पुनरागमन केले. भाजप समाजात जातपातीत विष पसरवून मतविभागणी करत सत्तेत येते, पण कामांच्या बाबतीत त्यांची कामगिरी झिरो आहे. आज रुपया नव्वद रुपयांपर्यंत घसरला असून देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला जात आहे. गोबेल्सनी अवलंबिलेल्या ‘खोटे बोल, रेटून बोल’ या नीतीचा अवलंब भाजप करत आहे. शेतकरी आत्महत्या, संविधान बदलण्याचे षडयंत्र, सोलापुरातील भाजप सत्तेचा फोलपणा, बंद पडणारे उद्योग — या सर्व बाबींवर जनतेत जागृती करणे काळाची गरज आहे. आपले नेते राहुल गांधी हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध ठामपणे लढत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांसारखे दीपस्तंभ नेते आणि व्यापक जनसंपर्क असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल. काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही. काळ बदलतो — काँग्रेस फिनिक्सप्रमाणे पुन्हा राखेतून उभारी घेईल.

          कार्यकर्त्यांना आवाहन करत त्यांनी शेवटी सांगितले, सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी कोण आले किंवा गेले याचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक दृष्टीकोनातून प्रामाणिकपणे काम करा. नक्कीच काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील.


         सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले, ०९ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी आणि आपल्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस आहे. तसेच सोलापूर महानगरपालिका निवडणुका देखील निकट आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या-आपल्या प्रभागात सामाजिक उपयुक्ततेचे कार्यक्रम आयोजित करावेत.

          चेतनभाऊ नरोटे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचे कार्य, सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या विकासाचा ठसा, तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या लोकहिताच्या कामांची माहिती घराघरांत पोहोचवावी. प्रत्येक प्रभागात ‘उमेदवारीचा विचार न करता मीच उमेदवार आहे’ या भावनेतून वातावरणनिर्मिती करा. लोकांच्या सातत्यपूर्ण गाठीभेटी घ्या. गेल्या दहा-अकरा वर्षांच्या भाजप सत्ताकाळात सोलापूरचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकत्याच पडलेल्या पावसात नागरिकांना भेडसावलेल्या अडचणी या अपयशी कारभाराचे स्पष्ट उदाहरण आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे. माझ्याबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु माझ्या रक्तात काँग्रेस आहे. काहीही झाले तरीही मी पक्ष बदलणार नाही. काँग्रेसची ताकद म्हणजे विचार — आणि तो विचार सोलापूरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे.

यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे,

माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर अरिफ शेख, अलकाताई राठोड, मा. नगरसेवक शिवा बाटलीवाला, प्रविण निकाळजे, नरसिंग कोळी, फिरदोस पटेल, विनोद भोसले, प्रदेश सचिव राहुल वर्धा, प्रा. नरसिंह आसादे, शकील मौलवी, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, भटक्या-विमुक्त विभाग अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर, माजी नगरसेवक एन.के. क्षीरसागर, सुभाष चव्हाण, प्रा. भोजराज पवार, मधुकर अठवले, वाहिद नदाफ, हारुण शेख, सौ. भारती इप्पलपल्ली, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे,

सरचिटणीस अँड. केशव इंगळे, अनिल मस्के, शफी हुंडेकरी, लखन गायकवाड, अनिल जाधव, गिरीधर थोरात, सागर शहा, संजय गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, भीमराव शिंदे, रजाक कादरी, गुरप्पा बुरकुले, सुभाष वाघमारे, बालाजी जाधव, सचिन पवार, माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, विनाताई देवकते, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, प्रा. संघमित्रा चौधरी, डॉ. मीना गायकवाड, नीता बनसोडे, रुकैयाबानो बिराजदार, शिवाजी साळुंखे, लता सोनकांबळे, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, चंदा काळे, रेखा बिनेकर, निशा मरोड, सुनिता बेरा, अनिता भालेराव, संतोष सोनवणे, डॉ. प्रकाश माने, तौसीफ शेख, शाकीर सगरी, अजीम शेख, शोएब कडेचूर, चंद्रकांत टिक्के,

महेंद्र शिंदे, श्रीनिवास परकीपंडला, अनिल खरटमल, सरफराज नदाफ, इम्तियाज यादगिर, सुनील डोळसे

रतन डोळसे, अभिलाष अच्युगटला, अजहर हिरापुरे, मीना गायकवाड आदी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा