उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
पुणे येथे एस .एम जोशी सभागृहात होणाऱ्या
देशातील दुसऱ्या ४ दिवशीय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल मध्ये काव्य सादरीकरणासाठी व अध्यक्ष पदासाठी सतरा वर्षीय कु.रमण रवींद्र बनसोडे याची निवड झाली आहे.
भिडेवाडा (देशातील पहिली मुलींची शाळा) येथील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल समितीच्या वतीने महाज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे जतन आणि साहित्य संस्कृतीच्या माध्यमातून प्रबोधन करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून २जानेवारी ते ५जानेवारी २०२६ रोजी पर्यंत हा दिव्य आणि भव्य फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. आयोजक विजय वडवेराव यांनी कु.रमण बनसोडे याला अध्यक्ष पदाचे निवडपत्र देऊन अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****"*जाहिरात***""👇
देशातील पहिल्यांदा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी एका सतरा वर्षीय मुलाची अध्यक्ष म्हणून निवड करून फुलेप्रेमी विजय वडवेराव यांनी नवीन मुलांना प्रोत्साहन देत कौतुकाची थाप मारली आहे.
कु.रमण रविंद्र बनसोडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा