Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

*करमाळा नगर परिषदेवर सावंत गटाचा शहर विकास आघाडीचा झेंडा* *नगराध्यक्षपदी सौ मोहिनी सावंत यांचा दणदणीत विजय* *पराभूत उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप तसेच शौकत नालबंद यांचा समावेश*

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*




करमाळा नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणी मध्ये सावंत गटाच्या शहर विकास आघाडीने बाजी मारीत करमाळा नगरपालिकेवर सत्ता काबीज केली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी नगरपालिकेची लढाई होती या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत युवा नेते सुनील बापू सावंत तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य व हमाल पंचायतीचे अध्यक्ष एडवोकेट राहुल सावंत यांनी संयुक्तरित्या उभा केलेल्या शहर विकास आघाडीला करमाळा शहर वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे 

                         --: जाहिरात:--



या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल आज हाती लागला असून यामध्ये एकूण नगराध्यक्ष सहित वीस जागे करिता निवडणूक लागली होती यामध्ये शहर विकास आघाडीच्या सावंत गटाने नगराध्यक्ष सहित नऊ जागेवर तर भारतीय जनता पार्टी प्रणित बागल गटाने सात जागेवर तर माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने फक्त पाच जागेवर विजय मिळवला आहे 


या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित विरोधी सावंत घटाने एकाकी निवडणूक लढवली होती यामध्ये शहरातील जनतेने त्यांना भरभरून मते दिली सदर निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना च्या वतीने माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी सौ नंदिनी देवी जगताप तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी नगराध्यक्ष कैलासवासी गिरधरदास देवी यांच्या सून सौ सुनीता देवी या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या यामध्ये जगताप व देवी यांना नगराध्यक्ष करिता पराभव पत्करावा लागला या निवडणुकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या बाजूने तर पालकमंत्री जयकुमार गोरे हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ सुनीता देवी यांच्या बाजूने भक्कमपणे उभा होत्या तरी देखील शहर विकास आघाडीच्या सावंत गटाने एक हाती सत्ता घेऊन प्रस्थापित मातब्बरांना एक प्रकारे धूळ चारली आहे


सदर निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत



वार्ड नंबर एक मधील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे 

 जबीन मुलाणी 1057 मते, शहर विकास आघाडी

रवी जाधव 2018 मते शहर विकास आघाडी

वार्ड नंबर दोन मधील विजयी उमेदवार 

माजी नगरसेवक संजय सावंत 1416 मते शहर विकास आघाडी

जोसना लुनिया 1230 मते शहर विकास आघाडी

वार्ड नंबर तीन मधील विजयी उमेदवार 

निर्मला गायकवाड 895 मते भाजपा

पूजा इंदलकर 702 मते शहर विकास आघाडी

वार्ड नंबर चार मधील विजयी उमेदवार 

स्वाती फंड 1010 मते भाजपा 

अतुल फंड 1231 भाजपा 

वार्ड नंबर पाच मधील विजयी उमेदवार 

साजिदा कुरेशी 493 शिवसेना शिंदे गट 

विक्रम सिंग परदेशी 678 शहर विकास आघाडी 

वार्ड नंबर सहा मधील विजयी उमेदवार 

सुवर्णा आलाट 705 शिवसेना शिंदे गट 

प्रशांत डहाळे 934 शिवसेना शिंदे गट 

वार्ड नंबर सात मधील विजयी उमेदवार 

अश्विनी अब्दुले 919 शिवसेना शिंदे गट 

युवराज चिवटे 735 मते शिवसेना शिंदे गट 

वार्ड नंबर आठ मधील विजयी उमेदवार 

सुनिता ढाणे ८२५ मते भाजपा 

दीपक चव्हाण 495 मते भाजपा 

वार्ड नंबर 9 मधील विजयी उमेदवार 

सचिन घोलप 546 मते भाजपा 

 लता घोलप 546 मध्ये भाजपा 

वार्ड नंबर दहा मधील विजयी उमेदवार 

संदीप कांबळे 610 मते शहर विकास आघाडी 

चैताली सावंत 646 मते शहर विकास आघाडी 

नगराध्यक्ष पदाकरिता मिळालेली मते खालील प्रमाणे 

सौ मोहिनी संजय सावंत 6520 मते,सुनिता कन्हैयालाल देवी 4680 मते तर सौ नंदिनी जयवंतराव जगताप 4557 मते 

                             चौकट

करमाळा नगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये दोन माजी नगराध्यक्ष सहित आठ माजी नगरसेवकाला पराभव पत्करावा लागला त्यांची नावे खालील प्रमाणे,,,,,,,,,

वैभव राजे जगताप माजी नगराध्यक्ष, शौकत नालबंद माजी नगराध्यक्ष, बानू जमादार माजी नगरसेविका, अल्ताफ तांबोळी माजी नगरसेवक, प्रवीण जाधव माजी नगरसेवक, सौ साधना मंडलिक माजी नगरसेविका, सौ संगीता खाटेर राहुल जगताप माजी नगरसेवक, सविता कांबळे माजी नगरसेविका, तसेच माजी नगरसेवक रवींद्र कांबळे यांचा समावेश आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा