*कार्यकारी संपादक -एस .बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378 081 147*
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर दिनांक 19 डिसेंबर) येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक तण नियोजन या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
या प्रात्यक्षिकामध्ये तणांची ओळख, तणांमुळे पिकांवर होणारे नुकसान तसेच तण नियंत्रणासाठी यांत्रिक, रासायनिक, जैविक पद्धतींचा योग्य समन्वय कसा साधावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योग्य व वेळेवर तण व्यवस्थापन केल्यास पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढून खर्चात बचत कशी होते याचे प्रत्यक्ष उदाहरणातून स्पष्टीकरण देण्यात आले.
*जाहिरात*
या प्रात्यक्षिकाचे आयोजन अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्राध्यापक एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्राध्यापक एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) तसेच विशेषज्ञ प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा