*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण यांचे वतीने इ. ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
रोटीरियन अभय सावंत व रोटीरियन आनंद कणसे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे होते.
प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
रोटीरियन अभय सावंत यांनी कोणत्याही एका भाषेवर आपलं प्रभुत्व असले पाहिजे त्यावर आपलं करिअर करू शकतो याविषयी सांगितले. तसेच रोटेरियन आनंद खणसे यांनी मुलांशी संवाद साधला. प्रत्येक व्यक्ती वेगळे असून त्याची जडणघड वेगळे आहे.त्यामुळे एकच डिग्री किंवा व्यवसायाच्या मागे न लागता आपली वेगळी ओळख निर्माण करावी.सतत नवीन शिकावे लागणार आहे.शिक्षणामध्ये अपग्रेड असणं महत्त्वाचं आहे.नुसती डिग्री असून चालणार नाही तर त्यासाठी सर्वांगीण कौशल्य महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना कॉन्सिलिंग करता आलं पाहिजे ते आपल्या बोलण्यातून दिसावं तसेच ग्रामीण भागातील मुलं हुशार असतात मात्र स्किल डेव्हलपमेंट मध्ये कमी पडू नये असे त्यांनी सांगितले.इंग्रजी भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी न्युज पेपर, पुस्तक, बातम्या वाचण्याचा त्यांनी सल्ला दिला तसेच हाय एनर्जी लेवल विद्यार्थ्यांमध्ये असावी असे सांगून सी डी एस म्हणजेच कुकिंग,ड्रायव्हिंग आणि स्विमिंग आपल्या सर्वांना करता आलं पाहिजे. तसेच वेगळा विचार करून वेगळा निर्णय घेता आला पाहिजे असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेज,किमान कौशल्य विभाग व गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर कॉलेज मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर आभार ज्युनिअर कॉलेजचे डॉ.कमलाकर फरताडे यांनी मानले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा