Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

लातूर कार जळीत कांडाला धक्कादायक वळण, "टर्म इन्शुरन्सचे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी लढवली युक्ती" ...'मृत' गणेश चव्हाण जिवंत सापडला,.

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो--९७३०८६७४४८


लातूर : लातूरमध्ये एका कारमध्ये 50 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होता. पण, एखाद्या सिनेमाला लाजवेल असं सत्य या प्रकरणात समोर आलं आहे. ज्या तरुणाचा कारमध्ये जळून मृत्यू झाला असं सांगितलं जातं होतं, तो जिवंत असल्याचं उघड झालं आहे. मृत तरुणानेच विम्याचे पैसे लाटण्यासाठी हा सगळा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघड केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथं एका कारमध्ये ५० वर्षीय तरुणाचा जळून मृत्यू झाला. गणेश चव्हाण असं या तरुणाचं नाव सांगितलं जात होतं. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मृत व्यक्ती गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचं समोर आलं आहे. गणेश चव्हाण यानेच विम्याचे १ कोटी रुपये मिळावे यासाठी स्वत: च्या हत्येचा बनाव केल्याचं समोर आलं आहे.

 तर मग कारमध्ये मृतदेह कुणाचा?

लातूर पोलिसांनी आरोपी गणेश चव्हाणला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग इथून अटक केली आहे. मृत गणेश चव्हाण हा एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी गणेश चव्हाणला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. गणेश चव्हाण याने स्वत: चं एक कोटी रुपयांचं टर्म इन्शुरन्स काढलं होतं. या विम्याचे पैसे मिळतील, अशी युक्ती त्याला सुचली. लातूरमधून जात असताना रस्त्यात गोविंद किसन यादव (वय ५०) या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती. पण, गणेश चव्हाण याने गोविंद यादवला कारमध्ये बांधून ठेवलं आणि आग लावली.

कुठे घडली घटना?

लातूर जिल्ह्यातील औसा-सोलापूर महामार्गापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता. ही कार चार तास जळत होती. या भयानक आगीत कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या ५० वर्षीय गोविंद यादव यांचा अक्षरशः जळून कोळसा झाला. शनिवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास एक स्कोडा कार वानवडा रस्त्यावर पेटताना स्थानिक नागरिकांनी पाहिली. या घटनेची माहिती ११२ या आपत्कालीन क्रमांकावर देण्यात आल्यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. कारची पाहणी केली असता, आतज्ञमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा