*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा शहर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांचे कुणबी चे दाखले जाणून बुजून कुर्डूवाडी येथील प्रांत अधिकारी हे अडवीत असल्याची गंभीर तक्रार सकल मराठा समाज चे अध्यक्ष सचिन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनावर सकल मराठा समाज बांधवांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सकल मराठा समाज बांधवांनी पुढे असे म्हटले आहे की
कुणबीचे दाखले प्रांताधिकारी यांच्याकडून अडवले जात आहेत
मा. प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडून कुणबीचे दाखले जाणीवपूर्वक अडवले जात आहेत त्यातील काही ठळक मुद्दे आपणास नमूद करत आहोत ते खालील प्रमाणे आहेत
सेल्फ अटेस्टेड , जर अर्जदार प्रतिज्ञापत्र सादर करताना सही करत असेल तर सेल्फ अटेस्टेड हे कशासाठी ही जाणीवपूर्वक अडवणूक आहे, .
घरातील एका प्रकरणाला तहसीलदार प्रमाणित प्रत असेल तरी घरातील दुसऱ्या प्रकरणाला ओरिजनल प्रति किंवा पेपर मागून अडवणूक केली जात आहे,
कुटुंबामध्ये जुने जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र असतानाही जाणीवपूर्वक प्रकरणे बाजूला ठेवली जात आहे जुन्या जात पडताळणी वैधता प्रकरणाला कवडीची ही किंमत दिली जात नाही, .
महसुली पुरावे असतानाही अनावश्यक फेरफार ची मागणी जाणीव पर्वक करून आडवणूक होत आहे, .
प्रकरण जर करमाळा तहसील कार्यालयाकडून कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाकडे आवकजावक च्या माध्यमातून जात असेल व त्रुटी लावून परत करमाळा येथे येत असेल तर ते प्रकरण फेर सादर करताना तहसीलदारांची सही घेऊन करमाळ्यातच ऑनलाइन करून देण्यात यावेत अशा मागण्याची निवेदन सकल मराठा समाज करमाळा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहेत
वरील सर्व अडवणुकीचे मुद्दे सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने आपणास समोर स्पष्ट मांडणी केली आहे कृपया आपण संबंधितांना तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने संबंधितांचा निषेध नोंदवून 1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या स्वागतावर शासनाचा , कलेक्टर ऑफिस सोलापूर , कुर्डूवाडी प्रांत ऑफिसचा निषेध म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद कृपया जिल्हाधिकारी साहेब यांनी घ्यावी असे आवाहन सकल मराठा समाज करमाळा व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने करण्यात आले आहे
सदर निवेदनावर सचिन काळे, पांडुरंग साळुंखे, माऊली पवार, दादासाहेब तनपुरे व दीपक गायकवाड या सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा