*यशवंतनगर --प्रतिनिधी*
*नाजिया मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व आणि आधुनिक माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची 108 वी जयंती महर्षि संकुल यशवंतनगर येथे अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी रामचंद्र गजाबा गायकवाड संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज ,डॉक्टर सुरज पवार त्वचारोग तज्ञ संग्रामनगर, प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रेमनाथ रामदासी साहित्यिक, अॅड नितीनराव खराडे सभापती प्रशाला समिती लाभले होते
सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत महर्षि बाल वाद्यवृंदांच्या बालचमूंमार्फत स्वागत गीताने करण्यात आले.
भविष्यातील अनंत काळापर्यंतच्या पिढ्यांना नवचैतन्य, प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा झरा व ग्रामीण भागातील सामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील असे मत प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, सहकाराचे मेरुमणी सरकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आल
संकुलातील विद्यार्थिनी भूमिका कारमकर व श्रावणी मोहिते यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत काकासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
आजच्या डिजिटल युगातही प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांची उधळण करण्याची संधी देणाऱ्या व प्रशालेच्या गत दोन वर्षातील कामगिरीचा वाढता आलेख दर्शवणाऱ्या महर्षी द्वैवार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते व्यासपीठावर संपन्न झाला.
प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांनी आपल्या व्याख्यानातून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत सहकार आणि शिक्षणाचे जे रोपटे लावले त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल .विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सहकार महर्षिंच्या जीवनातून जिद्द आणि कष्टाचे धडे गिरवले पाहिजेत असा विचार व्यक्त केला.
शैक्षणिक वर्षभरात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्था बाळे यांच्यामार्फत दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार सहशिक्षिका रचना सतीश रणनवरे, आदर्श प्रयोगशाळा सहाय्यक पुरस्कार प्रकाश गोपीनाथ गवळी यांना नुकताच जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संग्रामसिंह मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये उत्कृष्ट लेझीम प्रशिक्षक पुरस्कार सहशिक्षक इलाही बागवान यांना मिळाल्याबद्दल संकुलामार्फत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथी डॉक्टर सुरज पवार त्वचारोग तज्ञ यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना सहकार महर्षिंच्या ठायी असणाऱ्या गुणांचे अवलोकन करून यशाचे उत्तुंग शिखर गाठण्याचे आवाहन केले.
मान्यवरांच्या शुभ हस्ते मकर संक्रांतीनिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, कैलास चौधरी ,अनिल जाधव विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,जया गायकवाड ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक उमेश बोरावके यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा