*संपादक.- -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आज दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी आला आहे. भाजपच्या उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड आणि मोहित गुरुदत्त गायकवाड हे मतदारांना मोदी हुडको येथे पैसे वाटप करत असताना प्रभाग २२ मधील काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी त्यांना रंगेहात पकडले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणूक काळात मतदारांना पैशांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा हा प्रकार लोकशाही मूल्यांना तडा देणारा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले.
काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी सदर प्रकाराची तात्काळ माहिती निवडणूक प्रशासन व पोलिसांना दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपकडून पैसे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा