*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामविस्ताराच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव समोर विद्यार्थी संघटनेच्या वतीने दरवर्षी नामविस्तार वर्धापन दिन साजरा करण्यात येतो,या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवराकडुन संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते,भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समिती व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या "जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान" या उपक्रमात भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक वाटप करण्यात आले, यावेळी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते (वैद्यकीय)अधिक्षक सिध्दार्थ जानराव,आशाताई कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे यांनी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान सभेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण व उद्देशिका विश्लेषण प्रत बाबत माहिती दिली व मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या,मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे,सामाजिक वैद्यकीय अधिक्षक सिध्दार्थ जानराव,आशाताई कांबळे,प्रदिप लष्करे, रणवीर जानराव,विवेक यादव,विजय राठोड सह इतर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा