*अकलूज--- प्रतिनिधी*
*शकुरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी अकलूज व ग्रामपंचायत तरंगफळ तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीनफिंगर्स कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कारशिबिर मौजे तरंगफळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे त्याचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी जेष्ठविधीज्ञ ऍड शांतीलाल तरंगे यांनी मार्गदर्शन केले यामध्ये महाविद्यालयाचे सुमारे दीडशे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत
महाविद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाज जागृती, जनजागृती याचबरोबर विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावेत म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी गावातील मंदिरांची स्वच्छता, रस्ते स्वच्छता, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राची स्वच्छता तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिर व इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणार आहेत.
"-----: जाहिरात:------👇*
सदर शिबिराचे उद्घाटन तरंगफळ गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ पद्मिनीताई नारायण तरंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शिंदे, ऍड शांतीलाल तरंगे समाजसेवक नारायण तरंगे, उपसरपंच सागर बोडरे, ग्रामसेवक पानसरे भाऊसाहेब, गोरख जानकर , सुहास तरंगे सर, सुजित तरंगे, नागेश साळवे, विशाल कांबळे, शेटे सर, आरोग्य विभागाच्या अधिकारी साळवे मॅडम व जाधव सर, अनिल पवार सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल लोंढे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा