*प्रतिनिधी --एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
बिगुल वाजलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट घड्याळ आणि तुतारी एकत्र लढण्याचा नारा दिला गेला तरी पण माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये तितकेसे चांगले जमून आलेले दिसत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका माळशिरस मध्ये लढवत असताना शरद पवार गटाने जागा देण्याचे सोडाच पण उमेदवार देताना विचारपूस केली नसल्याचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
******जाहिरात****"👇"
दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सागर घाडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून माळीनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभा विधानसभा यावेळी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करून प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडलेली आहे तरी देखील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे युवक कार्यकर्ते व नेते यांना विचारात न घेतल्यामुळे उमेदवाराला याचा फटका बसू शकतो. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दोन-तीन दिवसात संपत असून त्यानंतर खऱ्या अर्थाने पक्षीय बलाबल समोर येणार असून जो तो आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे यादरम्यान कार्यकर्ते नाराज झाल्यामुळे काही ठिकाणी मतांचे गणित बिघडू शकते.
चौकट
जिल्हा परिषद व पंचायत समिती गटासाठी शरद पवार गटाने दिलेल्या उमेदवाराबाबत जनतेतूनच नाराजी असल्याचे चित्र माळीनगर व संपूर्ण गटात पाहताना दिसून येत आहे . तसेच सदर उमेदवाराबाबत मित्रपक्षांना व कार्यकर्त्यांना विचारात न घेता उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे योग्य वेळी आमची दिशा ठरवून आम्ही आमचा निर्णय घेऊ.
-सागर घाडगे
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
(अजित पवार)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा