Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

*सोलापूर तालुका, पोलीस ठाणेची कारवाई* *सोलापूर ते बार्शी रोड वरील मौजे खेडपाटी येथील घुंगरू कला केंद्रावर पोलीसांची छापा कारवाई 6 लाख 5 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*

 सोलापूर प्रतिनिधी 

आंबिद बागवान 

टाइम्स 45 न्यूज मराठी



श्री. अतुल कुलकर्णी, मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले श्री. महेश घोडके, पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले अंमलदार याचेसह दिनांक 21.01.2026 रोजी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत मौजे खेड पाटी येथील घुंगरू कला केंद्र येथे काही महिला अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नृत्य करीत आहेत अशी बातमी मिळाली होती.

मिळालेल्या बातमी नुसार पोउपनि महेश घोडके, महिला व पुरूष पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजे खेड पाटी येथील घुंगरू कला केंद्रावर दिनांक 21.01.2026 रोजी छापा टाकला तेंव्हा त्यांना घुंगरू कला केंद्रा मधील दोन महिला हया बिभत्सपणे अश्लील हावभाव करून तेथे ठेवलेल्या साऊंड बॉक्सच्या संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसुन आले. तेथे प्रेक्षक समोरील नर्तकीकडे पाहुन अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसुन आले. घुंगरू केद्रा येथे असलेले मॅनेजर यांना त्याचे नाव विचारता त्यांनी त्याचे अक्षय नागनाथ माने असे सांगितले. त्यांना घुंगरू कला केंद्राचे मालक कोण आहेत असे विचारता त्यांनी अरूण रोडगे हे असल्याचे सांगितले.

सदर कला केंद्रातुन 5,000/-रूपये किंमतीचे Takal कंपनीचा साऊंड बॉक्स व कला केंद्राच्या समोरील पटांगणात लावण्यात आलेली 6 लाख रूपये किंमतीची मारूती कंपनीची स्वीप्ट मॉडेलची चारचाकी कार असा एकूण 6 लाख 5 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर बाबत मपोउपनि/डोंगरीताट यांनी घुंगरू येथील कला केंद्रा मधील 2 महिला, 3 प्रेक्षक, मॅनेज

केंद्राचे मालक असे एकूण 7 आरोपी विरूध्द दिलेल्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला असून गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची छापा कारवाई मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोउपनि/महेश घोडके, मपोउपनि/सीमा डोंगरीतोट, पोहवा/280 जगताप, पोना/395 अभिजित साळुंखे, पोकों/अकबर शेख, महिला पोलीस अंमलदार पाटील यांनी बजावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा