Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशन चे घवघवीत यश.

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



18 जानेवारी रोजी पुणे भोसरी येथे 2300 विद्यार्थ्यांच्या उपस्थित अरिस्टो किड्स आयोजित आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमी चे 42 विद्यार्थ्यांचा सहभाग होता या परीक्षेसाठी इतर राज्यातून व जिल्ह्यातून विद्यार्थी आलेले होते. 

या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना दहा मिनिटात 100 गणिते अचूक सोडवणे बंधनकारक होते. 

व त्याच दिवशी संध्याकाळी रिझल्ट डिक्लेअर करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रचंड पालकांच्या उपस्थित  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. 

अबॅकस लेवल फिफ्थ मध्ये श्रावणी महेश गवळी या विद्यार्थिनींचा सेकंड रँक व सई विनोद पडवळे या विद्यार्थिनींचा थर्ड रँक आलेला आहे. 

अबॅकस लेवल थर्ड मध्ये रिदम भूपेंद्र बोराडे या विद्यार्थ्यांचा थर्ड रँक आलेला आहे.

अबॅकस लेवल फर्स्ट मध्ये अनुष्का ब्रह्मदेव नलवडे या विद्यार्थिनीचा फर्स्ट रँक आलेला आहे. 

अबॅकस लेवल झिरो जुनियर गटामध्ये जेऊर इरा पब्लिक स्कूल चा वीरप्रताप सूर्यकांत चौधरी या विद्यार्थ्याने फोर्थ रँक मिळवलेला आहे . जूनियर गटामध्ये शिवांजय उमेश सावंत या विद्यार्थ्याने प्रथम रँक मिळवलेला आहे.

सीनियर गटामध्ये अक्षता माधव कदम चौथा रँक मिळवलेला आहे रँक मध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चार ते पाच मिनिटांमध्ये शंभर गणित अचूक सोडवलेले आहेत वरील सर्व विद्यार्थ्यांना  मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा या सरांच्या हस्ते ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. मुथा नॉलेज फाउंडेशनचा मास्टर जीनियस विद्यार्थी सार्थक मकरंद वनारसे याला अबॅकस दहा लेव्हल कम्प्लीट केल्याबद्दल मास्टर ऑफ अबॅकस डिग्री अवॉर्ड , ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन

कन्वोकेशन  पदवीदान समारंभ  कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 




  आंतरराष्ट्रीय शायनिंग स्टार अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी. 

आर्यन जाधव, राजवी मोरे, स्वरा जाधव, शिवतेज कदम,समर्थ सूर्यवंशी, सानवी राठोड, आदिती खरात, सानवी गणगे, राजवीर पोळ, नेत्राली शिरसकर, वेदांत रोडे, शर्वरी शिंदे, शिवम सूर्यवंशी, स्वरा पडवळे, कृष्णा माळी, शिवेंद्र गरड, शिवराज ढवळे ,शिवम ढवळे, आहील बागवान, अनन्या फंड,प्रतीक सावंत ,ओजस गांधी, देवांशी शिंदे ,आयुष नलवडे,

 सिद्दीक बागवान 

रनर अप अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी 

साई काळे , ऋषिराज लष्कर  मयंक गवळी साद बागवान, नमोकार शहा, अभिराज यादव. चैतन्य मरोडकर

सहभागी विद्यार्थी कार्तिक शिंदे. सर्व विद्यार्थ्यांना संस्थापिका मुथा मॅडम, सहशिक्षक वनारसे मॅडम सावंत मॅडम गौरी मॅडम दिपाली मॅडम या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

मुथा नॉलेज फाउंडेशनच्या संस्थापिका ज्योती मुथा मॅडम यांचे ही 

बेस्ट अकॅडमी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येक स्तरातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे व पुढील यशासाठी शुभेच्छा ही देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा