*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
दिनांक २१/०१/२०२६ रोजी आंबेगांव पोलीस स्टेशनकडील अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्वामी नारायण मंदिराजवळ, सर्विस रोडवर, आंबेगाव खु, पुणे या ठिकाणी एक इसम थांबला असून त्याच्याजवळ अग्निशस्त्र आहे. सदबाबत वरिष्ठांना कळविले असता
वरिष्ठांनी नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन मिळून आल्यास कायदेशिर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानूसार आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक यांनी पथकासह जावून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून इसम नामे सुयश सोमनाथ घोडके, वय २४ वर्षे, काम-शेती, रा. फ्लॅट नं १७, सिध्दी हाईट्स, अभिनव कॉलेज जवळ, नहे, पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे रु ४१,०००/- रु किंमतीचे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले. त्यानंतर त्यास आंबेगांव पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. नमूद आरोपीस दाखल गुन्हयात अटक करून त्याची मे न्यायालयाकडून दिनांक २३/०१/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी घेतली असून त्याबाबत तपासी अधिकारी मोहन कळमकर, पोलीस उप-निरीक्षक अधिक तपास करीत आहेत. वर नमूद आरोपीविरुध्द वालचंद नगर पोलीस स्टेशन, ता. इंदापूर पुणे ग्रामीण याठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे श्री मिलींद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे मपोशि दिक्षा मोरे यांच्या पथकाने केली.
(शरद झिने)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा