Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिखलठाण मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360


*करमाळा:* भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकरांबरोबरच विद्यार्थ्यांनी देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी संविधानात नागरींकांसाठी नमूद केलेल्या कर्तव्यांचेही पालन करावे असे प्रतिपादन ॲड. सविता शिंदे यांनी केले. त्या न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिखलठाण येथे *77* वा *प्रजासत्ताक दिन* समारंभात बोलत होत्या. ॲड. सविताताई बाळकृष्ण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. ब्रिजेश बारकुंड, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हरिश्चंद्र बारकुंड संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. विद्याताई बारकुंड, प्राचार्य श्री कसबे सर उप मुख्याध्यापक श्री हराळे सर कॉलेज विभाग प्रमुख श्री शिंदे सर उपस्थित होते.




या वेळी सिनियर केजी मधील  विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे " *विद्यार्थी कवायत व मानवी मनोरे "* इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच" *लेझिम* " मध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनींनी अतिशय शिस्तबद्ध व तालबद्ध आपली कला सादर केली. 

वार्षिक क्रिडा सप्ताहात ज्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली त्या सर्वांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. 



 शासकीय *एलिमेंट्री व इंटरमिजिएट*  चित्रकला परिक्षेत विशेष प्राविण्य  मिळविलेल्या  विद्यार्थ्यांना(सरपंच ग्रामपंचायत चिखलठाण यांच्या वतीने ट्रॉफी) व सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय,विभाग स्तरीय, जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय *शालेय क्रिडा* *स्पर्धेतील* विजेत्यांना मेडल  व सर्टिफिकेट देण्यात आले. याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधून घेण्यात आलेल्या *निबंध* स्पर्धेचे तसेच राजमाता जिजाऊ जयंती व  मकर संक्रातीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या *रांगोळी* स्पर्धेतील विजेत्यांना ( सरपंच ग्रामपंचायत चिखलठाण यांच्यावतीने ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले )




सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी खाऊवाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खाडे सर  व श्री.हराळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. वाघमोडे मॅडम यांनी केले.

हा देखणा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष,  मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ड्राइवर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.

---: जाहिरात:---👇





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा