Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

*ब्लू पॅंथर ग्रुप व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करमाळा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा माजी आमदार जयंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

ब्लू पॅंथर ग्रुप व बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा संस्थापक आशुतोष (भाऊ) शेलार यांच्यावतीने विविध उपक्रम राबवून भव्य अशी मिरवणूक काढून भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला*

       ब्ल्यू पॅंथर ग्रुप व सामाजिक बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने 1 जानेवारी 2026 रोजी १०:०० वाजता विजय स्तंभाला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन व बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन  मा.दशरथरावजी कांबळे - शेतकरी संघर्ष समितीचे, प्रमुख उपस्थिती -आरपीआयचे नागेशजी कांबळे. दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, जितेश (बापू) कांबळे,बाबा घोडके, ॲड. महादेव कांबळे ,रणजित कांबळे (युवानेते) 

हुमरान मुलानी व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

      सकाळी १०:३० मिनिटांनी रक्तदान शिबिर( मेडिकेअर ब्लड सेंटर सोलापूर ) घेण्यात आले यावेळी 55 जणांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्घाटक म्हणून करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मा.शिल्पा ताई ठोकडे मॅडम. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून  संजय (अण्णा) सावंत (नगराध्यक्ष) , शंभुराजे जगताप (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती) संतोषजी वारे - (जि.सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस), नगरसेवक - प्रशांत ढाळे , सचिन (मालक) गायकवाड (नगरसेवक) ,  अतुल फंड (नगरसेवक), जमीर सय्यद ( शहराध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस )उपस्थित होते 

      सकाळी ११:०० वाजता डोळे तपासणी शिबिर ( एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय करमाळा ) मधुमेह ब्लड प्रेशर तपासणी शिबिर. रक्तातील ऑक्सिजन प्रमाण ईसीजी  ( हृदयाची पट्टी ) कमल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करमाळा घेण्यात आले यामध्ये तब्बल 192 पेशंटने सहभाग नोंदविला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अश्विनी अब्दुले (नगरसेवक) संदीप कांबळे (नगरसेवक)

युवराज चिवटे (नगरसेवक) यांनी 

गणेश चिवटे (जि.सरचिटणीस भाजपा) रोहिदास अल्हाट (नगरसेवक) अफसर जाधव (डबल महाराष्ट्र चॅम्पियन) सचिन ढाणे ( उद्योजक) सनी जाधव

 हे उपस्थित होते 

      दुपारी १२:०० वाजता कुटीर  रुग्णालय व मूकबधिर शाळा  येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून मा. नवनीत अडसूळ (विशेष सरकारी वकील मुंबई हायकोर्ट) प्रमुख उपस्थिती - वंदना कांबळे , प्राची शेलार , रोशनी आहेर , विशाखा बडेकर, ब्ल्यु पँथर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते 

सायंकाळी ४:३० वाजता करमाळा तालुका पत्रकार संघाचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

   सायंकाळी ५:३० वाजता सिद्धार्थ स्पोर्ट क्लब भीम कन्या लेझीम संघ यांनी अप्रतिम लेझीम चे डाव सादर केले व सायंकाळी ६:०० वाजता शौर्य दिना निमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभ च्या प्रतिकृतीची भव्य अशी वाजत  मिरवणूक सुरू करण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटक म्हणून मा. जयवंतरावजी जगताप साहेब (माजी आमदार , चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा ) यांच्या हस्ते विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू करण्यात आली . प्रमुख उपस्थिती -   बिभीषण जाधव (पोलीस उपनिरीक्षक) 

जयराज चिवटे (उद्योजक) ,अमीर तांबोळी (उद्योजक) , संकेत खाटेर (उद्योजक) सुजित (तात्या) बागल, राजु सय्यद (पत्रकार) ,निलेश कांबळे , जोतीराम ढाणे, जयकुमार कांबळे.

         या भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन ब्ल्यू पॅंथर ग्रुप व बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक आशुतोष भाऊ शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष  अरबाज पठाण. मिरवणूक प्रमुख जीत भागवत , सिद्धार्थ ताकतोडे. उपाध्यक्ष. गुरु गायकवाड , बंटी आवाड. खजिनदार नेहाल बडेकर. सह खजिनदार आकाश कुंभार सचिव मंगेश ओहोळ. सह सचिव सुमित साखरे. व  शंभुराजे आहेर, बादल बडेकर,संदेश कांबळे,तुषार बडेकर, आकाश दामोदरे, प्रशांत राजपुरे,गणेश झाकणे सर्व पदाधिकारी उपस्थित होते  

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनी ताकतोडे.अनिकेत नाळे. आकाश धनवे. अभिजीत सूर्यवंशी. तुषार साखरे. अल्फाज सय्यद. मुन्ना बडेकर.अमोल सुरवसे,रणजीत जाधव.साहिल पठाण. रवी ओहोळ.आर्यन शेख.अनिस मुलानी. दिनेश दळवी. राज शेख. रोहन ओहोळ. अमोल आवाड. यश भागवत. आदी जणांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा