*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आजच्या तरुणाईने आपल्या आई वडिलांची मान शरमेने खाली जाणार नाही,असे वर्तन ठेवावे असे मत प्रा. महादेव तळेकर यांनी व्यक्त केले.ते
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने चौंडेश्वरवाडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब माने देशमुख हे होते.
आजचा युवक- काल आज आणि उद्या या विषयावर बोलताना प्रा.तळेकर पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.आपल्या देशाला विचारांचा मोठा वारसा आहे तो वारसा पुढे नेण्याचे काम आपण करायचे आहे.सध्याच्या विज्ञान युगात आपण काळाबरोबर चालायला शिकलो पाहिजे पण त्याचबरोबर आपला उत्तुंग वारसाही आपण लक्षात ठेवायला हवा तरच उज्वल भविष्य घडविता येईल
या कार्यक्रमाचे स्वागत प्रा.दत्तात्रय मगर यांनी तर प्रास्ताविक व प्रमुख वक्त्याची ओळख डॉ.सज्जन पवार यांनी केली.डॉ.विजय शिंदे यांनी आभार मानले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.स्मिता पाटील,एकनाथ बोडके,जाधवर सर व चौंडेश्वरवाडी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा