*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यामधील कंदर येथील शिक्षिका रत्नमाला होरणे यांनी कथा लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे
शिक्षक व अधिकारी स्पर्धा सन 2025 -- 26 यातील कथालेखन स्पर्धेत जि. प. प्राथ. शाळा भांगेवस्ती कंदर येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती. रत्नमाला दत्तात्रय होरणे यांचा तालुक्यात प्रथम क्रमांक व त्यानंतर विभागीय स्तरावर निवड झाली होती. विभागीय स्तरावर तीन जिल्ह्यातून पुणे सोलापूर अहिल्यानगर त्यांचा तृतीय क्रमांक आला असून त्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. विनोबा या शैक्षणिक ऍप मधील शैक्षणिक पोस्टमध्ये दोन वेळा तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. यापूर्वीही त्यांना विविध अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची विद्यार्थी प्रिय समाजप्रिय शिक्षकप्रिय म्हणून ओळख आहे. राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अमित कदम गटशिक्षणाधिकारी नितीन कदम विस्तार अधिकारी जयवंत नलवडे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.
कंदर तालुका करमाळा येथील शिक्षिका श्रीमती रत्नमाला होरणे यांनी यापूर्वी विविध पुरस्कार मिळवले आहे त्यांच्या या कथालेखन स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा