*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सरफडोह येथील श्री सर्पनाथ मंदिरास तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून निधी उपलब्ध करुन आणखी विकास करणार असे ठाम आश्वासन युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली. सरफडोह येथील विकास कामाच्या भुमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. करमाळा/माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.श्री.नारायण (आबा) पाटील यांच्या स्थानिक आमदार फंडातून श्री.सर्पनाथ मंदिर सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी दिला गेला. प्रशासकीय मंजुरी मिळताच या कामाचा भूमिपूजन सोहळा आज करमाळा माढा मतदारसंघाचे युवा नेते पै.पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की सरफडोह ग्रामस्थांच्या जमीनीच्या वर्ग १ बाबतचा प्रश्न लवकरच सुटला जाईल. शेतकऱ्यांना त्याच्या जमीनीची हक्काची नोंद उताऱ्यावर करता येऊन शासनाच्या विविध लाभ योजना तसेच विविध बँकेच्या माध्यमातून शेतीसाठी वा घरासाठी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी आमदार नारायण आबा पाटील हे सातत्याने हा जमीन नोंदीचा प्रशन सुटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या समोरही आदरनीय आबासाहेब हा प्रश्न लवकरच मांडणार असुन यासाठी मंत्रालयीन पातळीवर एका बैठकीची मागणी करणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी
सांगितले. यावेळी मार्गदर्शक प्रा. अर्जुन सरक सर, पाटील गटाचे प्रवक्ते श्री.सुनील तळेकर सर, सौंदे गावचे सरपंच ज्योतीराम लावंड, श्री.बाळासाहेब पवार (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), ज्ञानेश्वर कळसे- माजी सरपंच , शिवाजी पाटील गुळसडी, संजय तोरमल उपसरपंच, मुकेश राऊत माजी सरपंच कोंढेज, दत्ताभाऊ जगदाळे युवा उद्योजक, संजय तनपुरे, प्रशांत पाटील वरकटणे, अंगद वीर शेलगाव, बादल सरपंच कोंढेज, सकाळ पत्रकार योगेश खंडागळे सर, ग्रा.पं. सदस्य जेऊर योगेश कर्णवर, युवराज भोसले, चेअरमन- विजय शिंदे सर,सरपडोह येथील पांडुरंग वाळके सरपंच, नाथराव रंधवे उपसरपंच, लक्ष्मण खराडे सोसायटी चेअरमन, रामचंद्र बोंद्रे ,महादेव नलवडे ,सुभाष पवार, विष्णू खरात, जगन्नाथ गायकवाड, काका वाळके, नागनाथ भिताडे, काकासाहेब भिताडे मेजर, विनायक पवार,मनोहर रंदवे, प्रविण भंडारे, सागर भिताडे, अजय घोगरे, लक्ष्मण जानभरे, हनुमंत रंदवे, वैभव गवारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक नाथासाहेब रंधवे यांनी केले तर आभार सरपंच पांडूरंग वाळके यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा