*अकलूज ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज : एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मार्गदर्शक विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या प्रकाशन सोहळ्यासआमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा. रेश्मा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, .किशोरसिह माने पाटील .विश्वतेजसिह मोहिते पाटील नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील तसेच अकलूज नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत म्हणाले की . संस्थेचे अध्यक्ष . जावेद बाबा तांबोळी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण उपक्रम तसेच कोरोना महामारीच्या काळात *कोविड योद्धा*’ म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
कोविड काळात गरजू नागरिकांना मदत, आरोग्यविषयक जनजागृती तसेच सामाजिक एकतेचा संदेश देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात आले. अशा सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्था भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवेत सदैव तत्पर राहील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी यांनी व्यक्त केला




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा