Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

*राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी व बागबान सोशल फाउंडेशन बार्शी यांच्या वतीने पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हीलचेअर भेट*

 *संपादक टाइम्स 45 न्यूज मराठी* 

  *मो:--9730867448*



महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी व बागवान सोशल फाउंडेशन, बार्शी यांचा स्तुत्य उपक्रम राबवला असून- राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हीलचेअर अर्पण करण्याचा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी आणि बागवान सोशल फाउंडेशन, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. हा कार्यक्रम 12 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बागबाव वर्किंग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान, पानगावचे सरपंच जयसिंग देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉं. महेश पाटील (लातूर) यांच्यासह पिंटू नाईकवाडी, प्रकाश कानगुडे, इब्राहिम काजी, जुबेरभाई येळशिकर, हाजी मुस्ताकभाई मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गावातील इम्रान बागवान, शारिक बागवान, सुलतान मुजावर, सलमान मुजावर, रईस बागवान वैराग आणि वैराग बागवान जमातीचे अध्यक्ष इस्माईलभाई बागवान यांचीही उपस्थिती लाभली.* रुग्णसेवेसाठी आवश्यक सुविधा देणे काळाची गरज :- व्हीलचेअरच्या लोकार्पणप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रुग्णांना सुलभ व सुरक्षित उपचारसेवा मिळण्यासाठी अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांची नितांत आवश्यकता असल्याचे मत डॉं.शरीफ बागवान यांनी व्यक्त केले. समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन आरोग्य संस्थांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी व बागवान सोशल फाउंडेशन, बार्शी यांच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजाला प्रेरणा देणारे व रुग्णांसाठी प्रत्यक्ष मदत करणारे असे कार्य सातत्याने सुरू राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


ग्रामपंचायतीकडून अभिनंदन :- पानगावचे सरपंच जयसिंग देशमुख यांनी आपल्या मनोगतात दोन्ही संस्थांचे कौतुक करीत, प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हीलचेअर देऊन रुग्णांसाठी मदतीचा हात दिल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाच्या शेवटी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक बापू यादव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा उपक्रम राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना साजेसा ठरला असून, आरोग्यसेवेसाठी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा