*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण (ता. कळंब): दिनांक 12 जानेवारी 2026, सोमवार रोजी मॉडर्न प्री-प्रायमरी स्कूल शिराढोण येथे बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन पालक भैरू भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन पोलीस कर्मचारी सौ. रंजना वडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती रोडे यांनी केले. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, स्वावलंबन व धाडस निर्माण व्हावे, आनंदी वातावरणात शिक्षण मिळावे तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सुमारे 35 खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. यामध्ये समोसा, मंचुरियन, मसाला राईस, वडापाव, पोहे, पॅटीस, चॉकलेट्स, बिस्किटे, पापड, बटाटा रोल, मुरकुल, लॉलीपॉप्स इत्यादी पदार्थांचा समावेश होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांना पालकांनी जवळ बसून उत्साहाने मदत करत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या या स्टॉलमधून जवळपास ९ ते १० हजार रुपये इतकी उलाढाल झाली.
या मेळाव्यास रंजना वडकर, गजेंद्र कोल्हापूरे, प्रवीण नानजकर, प्रणय महामुनी, भैरू भंडारे, दत्ता आदोडे, हनुमंत ठोंबरे, किरण पानढवळे, ठोंबरे मॅडम, अनिकेत धाकतोडे, अभिजीत यादव, परमेश्वर यादव, स्वप्नाली यादव, राधा माकोडे, भगवान टोपे, प्रियंका पानढवळे, सावित्री ठाकूर, राघू भंडारे, स्वामी, सोनम शेख, मनीषा सुडके, प्रियंका सुडके, सुमित्रा धाकतोडे, पूजा यादव, पल्लवी यादव, अश्विनी होनमने, प्रवीण पौळ, वाजिद डांगे, उषा सुडके यांसह अनेक पालक उत्साहाने उपस्थित होते.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका स्वाती रोडे मॅडम, अर्चना जाधवर मॅडम, अंकिता नथाडे मॅडम, सपना गायकवाड व सुमित बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा