*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा – २०२६ निमित्त राजधानी रायगड येथे १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात जलाभिषेकाचा मान मिळाल्याबद्दल धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
शिवशंभूंच्या विचारधारेचा आणि संस्कृतीचा सन्मान राखत दिला जाणारा हा मान अत्यंत गौरवपूर्ण असून, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही पावती मानली जात आहे. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून, शिवपरंपरेचा वारसा जपणाऱ्या विचारांचा गौरव असल्याची भावना सर्व स्तरातून होत आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मिळालेला हा सन्मान भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, तसेच शिवशंभूंच्या परंपरेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्यास निश्चितच मोलाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी दिली.
या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा