*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
उमरगा जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथील चेक पोस्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचारी झेंड्याला सलामी दिल्यानंतर फोटोसेशन करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव हे ओळीत उभा राहिले असता अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन खाली कोसळले आणि तेथेच त्यांचा प्राण गेला खाली कोसळल्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागला तात्काळ उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी उपनिरीक्षक मोहन जाधव यांना मृत घोषित केले सहा महिन्यापूर्वीच त्यांचे प्रमोशन झाले होते त्यांचे मूळ गाव सोलापूर आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा