*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित डी फार्मसी कॉलेज अकलुज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ५१ रक्तदानदात्यांनी रक्तदान केले.
कै.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान ही संकल्पना जाणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड व कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५१ जणांनी रक्तदान केले.
सदरच्या शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब देवडकर,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी तसेच ब्लड बँकचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजित गांधी आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
∆∆∆∆∆---जाहिरात---∆∆∆∆∆👇
________________________&____________________






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा