संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
सौ. दिपाली अनिल अष्टेकर या सांगोला एस. टी. आगारामध्ये वाहक ई नोकरी करीत होत्या. दिनांक ०२/०२/२०१८ रोजी सांगोला अकलुज ही बस घेवून संध्याकाळी ६.१५ वाजता अकलुज येथे पोहोचले. सदर बस अकलुज नवीन बसस्थानकामध्ये फलाट नं. ३ वर चालक तानाजी निवृत्ती केंगार यांनी उभी केली. त्यावेळी बसमध्ये खुप गर्दी असल्यामुळे वाहक दिपाली अष्टेकर यांनी प्रवाशांना बसमध्ये जागा नाही उभे राहून यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी एकाने "तुला काय करायचे आहे, तुझ्या मांडीवर बसून न्यायचे आहे काय" असे म्हणून बसमध्ये चढले. त्यावेळी त्यांनी वाहक अष्टेकर यांना आर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळी, दमदाटी केली. नंतर रागाने बसमधून खाली उतरुन गेले. बस मार्गस्थ होत असताना या दोन युवकापैकी एकाने ए बस थांबव, आम्हाला यायचे आहे असे म्हणाल्याने चालकाने बस स्थांबविली. त्यांनी वेळापूर येथे जायचे आहे असे सांगितलेवर वाहक अष्टेकर यांनी बसमध्ये जागा नाही, आताच तुम्ही उतरला होता ना असे म्हणाले असता त्यांनी पुन्हा शिवीगाळी केली तेव्हा वाहक त्यांना शिवी देवू नका असे सांगत असताना एकाने दोन्ही हातावर त्याच्या हाताने मारले व दुस-याने हातावर व गळयावर मारले तेव्हा बस चालक केंगार, महेश पावसे व इतर प्रवाशांनी सोडवासोडव केली. त्यानंतर पावसे यांनी त्यांना वाहतुक नियंत्रक खोलीकडे घेवून जावून पोलीसांना कळविले नंतर अकलुज पोलीस स्टेशनकडील पोलीस आलेवर त्यांना त्यांची नांवे विचारलेवर गणेश कृष्णदेव पवार, योगेश पोपट गोडसे दोघे रा. बाभुळगांव ता. माळशिरस असे सांगितले. त्यानंतर वाहक दिपाली अष्टेकर यांनी शासकीय कामात हरकत अडथळा केला, शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केलेबाबत त्या दोघांविरोधात तकार दिल्याने भा.द.वि.सं.क. ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार बाबासाहेब भातुंगडे यांनी करुन आरोपीविरुध्द मे. न्यायालयात चार्जशिट दाखल केले. मे. कोर्टात सदर केस चालू असताना फिर्यादी, साक्षीदार, सुर्यकांत नागण्णा सलगर, महेश भागवत पावसे, डॉक्टर सुनिल नरुटे, तपासीक अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. त्यावरुन या प्रकरणात मा. श्री. एल. डी. हुली सो।, जिल्हा व सत्र न्यायाधीश, माळशिरस यांनी दोन्ही आरोपींना भा.द.वि.सं.क. ३५३ नुसार दोशी धरून २ वर्षे सश्रम व २००० रुपये दंड, व भा.द.वि.सं. क. ३३२ नुसार २ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड, तसेच भा.द.वि.सं.क. ५०४ नुसार ६ महिने सश्रम कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर केसमध्ये संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग, अकलुज, निरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. सदर केसमध्ये सरकारी वकील संग्राम एस. पाटील व शंतीनाथ तात्या मेंढेगिरी यांनी तसेच कोर्ट पैरवी पोलीस हवालदार रियाज तांबोळी, हरीष भोसले यांनी काम पाहिले.
(निरज उबाळे)
पोलीस निरीक्षक,
अकलुज पोलिस ठाणे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा