Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ जानेवारी, २०२६

इंदापूर तालुक्यात आजी माजी मंत्र्यांनी राजकारणाचा जो राजकीय चिखल निर्माण केला त्यामध्ये कमळ फुलवण्याचे काम मतदार राजांनी करून परीवर्तन घडवावे - भाजप नेते प्रवीण भैय्या माने

 *कार्यकारी संपादक*  

*एस.बी.तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी                                               मो. 8378081147*


 इंदापूर तालुक्यात आजी माजी मंत्र्यांनी राजकारणाचा जो राजकीय चिखल निर्माण केला आहे. त्यामध्ये कमळ फुलवण्याचे काम मतदार राजांनी करून परीवर्तन घडवावे असे आवाहन भाजप नेते प्रवीण भैय्या माने यांनी केले.





   नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथे बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अंजली अभिजीत घोगरे, यास्मिन मुनीर आत्तार, सुधीर भैय्या कोकाटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला. यावेळी विजय घोगरे, श्रीकांत दंडवते, नागेश गायकवाड, पोपट डिसले, महेश क्षिरसागर, संगिता दंडवते, सद्दाम आत्तार, मुस्तफा शेख, चंद्रकांत सरवदे, बालाजी बोडके, युवराज बोडके, लखन डिसले, दादा कवडे, अरूण घोगरे, लखन डिसले, विशाल क्षिरसागर, नागेश काळे, नितीन जगदाळे, अमोल बोडके आदि मान्यवर उपस्थित होते. 




     प्रविण माने बोलताना पुढे म्हणाले, विरोधकांनी आपली पुढची पिढी राजकारणात उतरवून घराणेशाही पुढे चालू ठेवण्याचे काम केले आहे. आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असाच सामना होणार आहे. कार्यकर्त्यांचा विचार न करता आपल्या मुलांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा डाव मतदारांनी हाणून पाडावा असेही आवाहन केले आहे.

   यावेळी उमेदवार अंजली घोगरे, मुनीर आत्तार, सुधीर कोकाटे, विजय घोगरे, प्रभाकर खाडे आदिंची भाषणे झाली. दरम्यान श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात दर्शन व आरती केली. त्यानंतर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

    इंदापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी देण्याचे धाडस भारतीय जनता पक्षाने केले आहे. परंतू तालुक्यावर ५० वर्ष सत्ता भोगणाऱ्या काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अल्पसंख्याक समाजाला उमेदवारीत डावलले आहे. त्यामुळे बावडा गणातून अल्पसंख्याक समाजाच्या यास्मिन मुनीर आत्तार यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने तालुक्यात याचा वेगळाच संदेश गेला आहे. अल्पसंख्याक समाजाने याचा बोध घेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

     दरम्यान पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीकांत बोडके व भाजपा नेते प्रविण माने यांची प्रचारा दरम्यान भेट झाल्याने याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

फोटो - नरसिंहपूर येथे भाजपाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ करताना.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा