Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ जानेवारी, २०२६

कितीही आदळ आपट केली तरी विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही नारायण आबा यांना एकटे पाडण्याचा डावपेच मतदार हाणून पाडतील,,,,,,,,,,,,,, सुनील तळेकर ..

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



कितीही आदळआपट केली तरी विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, नारायण आबांना एकटे पाडण्याचा डावपेच मतदारच हाणुन पाडतील असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी बोलून दाखवला. करमाळा तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून अनेकांनी प्रचारास सुरुवात केली आहे. आमदार नारायण आबा पाटील गटाच्या प्रचार नियोजना विषयी विचारले असता पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की लवकरच आमदार नारायण आबा पाटील यांचा गावभेट व कोपरा सभा दौरा सुरू होईल. प्रत्येक गणात काही मोठ्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार नारायण आबा पाटील हे कायम जनमाणसात वावरत असतात. अलिशान फार्म हाऊस व काचेच्या बंगल्यात राहणारी मंडळी केवळ निवडणुकी पुरतीच गावोगाव भटकंती करत आहेत. या मंडळींना राजकीय पदे केवळ मिरवायला व लग्न समारंभातील सत्कार स्विकारण्यासाठी हवीत. आमदार नारायण आबा पाटील यांच्यासाठी सत्ता हे जनसामान्यांच्या विकासाचे साधन आहे व राजकीय पद ही जनसेवेसाठी जनतेने विश्वासाने टाकलेली जबाबदारी आहे. आमदार नारायण आबा पाटील यांचा जनसंपर्क कायमच अविरतपणे सुरू राहीला आहे. जनसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन कठीण प्रसंगी जनतेला, शेतकऱ्यांना धीर देण्याची भुमिका आमदार नारायण आबा पाटील यांनी कायमच चोखपणे बजावली असल्याने प्रत्येक निवडणुकीत पाटील गटास यश मिळत असते. जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक सुध्दा सर्वसामान्य जनता ताब्यात घेणार असल्याचा पुर्वानुभव आहे. यामुळे या निवडणुकीसाठी कोण कोणाशी हात मिळवणी करतेय वा कोण केवळ मते खाण्यासाठी उभा राहतय याची नोंद मतदारांनी करुन ठेवली आहे. करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवणे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास उपक्रम अधिक गतिमान करणे हा एकमेव अजेंडा घेऊन आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडी या निवडणुकीत उतरली आहे. या निवडणुकीनंतर करमाळा तालूक्याच्या राजकारणातुन काही गट आपले उरले सुरले राजकीय अस्तित्व गमावून बसतील असे सुचक वक्तव्य पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा