*तुळजापूर ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तुळजापूर येथील जिजामाता नगरीत दि.१२ जानेवारी सोमवारी सुसंस्कृत व प्रेरणादायी वातावरणात संयुक्त जयंती सोहळा संपन्न झाला. जिजामाता नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थोर विभूतींना अभिवादन केले.
या कार्यक्रमास नगरसेविका प्रियांकाताई विजयकुमार गंगणे, नगरसेवक चंद्रशेखर भोसले, नगरसेवक लखन पेंदे,माजी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे,नगरसेवक अजित परमेश्वर तसेच जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नुतन नगरसेवक मधुकर शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रघडणीतील योगदानावर तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला. समाजातील तरुण पिढीला प्रेरणा देणाऱ्या या विचारांचा वारसा जपण्याची गरज उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर बोलताना नुतन नगरसेवक मधुकर शेळके यांनी परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य देत विकासाभिमुख कार्य सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता नगरात उपक्रमशील वातावरण निर्माण होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक राहुल जगताप, शेखर फुगारे, महेश शिंदे, सुरेश शेळके, सोनू सरडे, सतीश शिरसाठ, कृष्णा मोरे, विशाल भोसले, सुमित कवडे, पारस शेळके, अण्णा शिंदे, हरी ओम मोरे, कुणाल शेळके, नाना शिरसाट, अमोल ठोंबरे, रोहित चोपदार, लक्ष्मण सुरवसे, समर्थ वाटणे, सुमित देशमाने, राहुल जाधव व चंद्रशेखर भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, नुतन नगरसेवक मधुकर शेळके यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली साजरी झालेल्या या जयंती सोहळ्याने जिजामाता नगरात एकतेचे, विचारांचे व विकासाचे संदेश प्रभावीपणे दिले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा