उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
जेतवन शैक्षणिक व सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट सुजायतपूर महाराष्ट्र द्वारा संचलित अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दिनांक.18 जानेवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रा.आयु.छायाताई बोरकर सामाजिक कार्यकर्त्या गोंदिया, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयु प्रणिता ताई गौतम कांबळे सामाजिक कार्यकर्त्या उमरखेड, उद्घाटक, आयु. प्रियाताई खाडे चंद्रपूर,कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या, अँड. विजयमाला मनवर नांदेड, भंते पैयाबोधी खुरगांव नांदुसा नांदेड. व भिक्खू गण,यां कार्यक्रमाचे आयोजन आयोजिका आयु. सावित्रीताई शेवाळकर, संस्थापक अध्यक्षा जेतवन सामाजिक शैक्षणिक चारीटेबल ट्रस्ट,यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सौ. सुनंदा राम वाघमारे नंदुरकर, व भंतेजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा
संस्थेतर्फे गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.ॲड.फरहीन खान पटेल यांच्या सामाजिक,शैक्षणिक, साहित्यिक कार्यांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमासाठी शहापूर परिसरातील व देगलूर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा