मुख्यसंपादक ---टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
जिजाऊ ब्रिगेड माढा तालुका व कुर्डूवाडी शहर यांच्या वतीने स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कुर्डूवाडीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे व सर्व नवनियुक्त महिला नगरसेविकांचा सन्मान जिजाऊ मॉंसाहेबांची प्रतिमा, जिजाऊ चरित्र, शाल व फेटा बांधून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ मॉंसाहेबांच्या प्रतिमापूजनाने झाली. काव्या निलेश देशमुख हिने जिजाऊ वंदना गायली. यावेळी सुप्रसिद्ध निवेदिका पल्लवी माने यांचा 'सन्मान स्त्री शक्तीचा, सोहळा आनंदाचा' होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला.
नवनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे यांचा सन्मान करताना जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा निताताई खटके व पदाधिकारी.
यात अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत बक्षीसे मिळविली.स्नेहा गवळी, प्रतीक्षा गोफणे, सीमा रजपूत, अंजली गावडे, अश्विनी शिनगारे यांच्या वतीने बक्षीसे देण्यात आली.नवनियुक्त नगराध्यक्षा जयश्री भिसे, नगरसेविका सविता जगताप,भाग्यश्री पाटील, स्नेहा गवळी,अबोली चौधरी,अंजली गावडे, रेश्मा गोरे, ऋषाली गांधी ,वनिता सातव, शुभ्रा गोरे, पल्लवी कांबळे,शहिस्ता चाऊस, सरस्वती क्षिरसागर, प्रतिक्षा गोफणे,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका निकिता नागेश खटके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनंदा रणदिवे, साक्षी डिकोळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा टोणपे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते हर्षल बागल यांनी मनोगतातून जिजाऊंची महती सांगून आज प्रत्येक आईने जिजाऊंचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा नीताताई खटके, कुर्डूवाडी शहराध्यक्ष मनिषा गाडे, कार्याध्यक्षा अरूणा पाटील शहर सचिव अश्विनीताई गवळी, शहर उपाध्यक्षा प्रफुल्लता मोहिते यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमासाठी नगरसेवक डॉ.मोहसीन मकणू, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक दिनेश जगदाळे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, संघटक कुलदिप खटके, सचिव सुरज मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*चौकट*
या महिला ठरल्या विजेत्या
'सन्मान स्त्री शक्तीचा, सोहळा आनंदाचा' होम मिनिस्टर कार्यक्रमात अनिता नाईकनवरे, स्वाती गुंड, स्वाती भोसले, अंजली मुंगळे, संगीता भोसले,सुचीता दिंडोरे या अनुक्रमे विजेत्या ठरल्या.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा